अत्याचार प्रकरणी ‘तो मी नव्हेच’ राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाचा दावा

बीड: दि.२९- बीड (Beed) जिल्ह्यातील तरुणाने औरंगाबाद (Aurangabad) येथे एका तरुणीला नोकरीचे आमिष देवुन अत्याचार (Rape) केल्याचा गुन्हा सिडको पोलिसात नोंद झाल्यानंतर सदरील तरुण म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र महेबुब यांनी सदरील प्रकरणी ‘तो मी नव्हेच’ असा खुलासा केला असून सदरील प्रकार माझे राजकीय अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी चालवलेला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिली.
औरंगाबाद (Aurangabad) येथील बायजीपुऱ्यातील २९ वर्षीय पीडितेने बीड (Beed) जिल्ह्यातील शिरुर कासार येथील शेख महेबुब इब्राहिम यांच्या विरोधात अत्याचाराची (Rape) तक्रार सिडको पोलिसात दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. माध्यमातून वृत प्रकाशित झाल्यानंतर शिरुर कासार जि.बीड (Beed) येथील तरुण म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब (Shaikh Mehboob) असल्याचे समोर आले. याबाबत महेबुब यांनी सोशल माध्यमातून (Social Media) खुलासा करत आयुष्यात ‘त्या’ तरुणीला कधीच भेटलो नसल्याचे सांगत तरुणीने नोंदवलेल्या तारखा पोलिसांनी तपासून पहाव्यात, या काळात ते मुंबई व त्यांच्या मुळगावी म्हणजे शिरुर कासार येथे असल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून स्त्रीचा आदर करणे आमची शिकवण असल्याचे सांगत पोलिसांनी (Police) ‘त्या’ तरुणीचा बोलवता धनी कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी केली. सदरील प्रकार हा एका सामान्य कुटूंबातील कार्यकर्त्यांचा राजकीय प्रवासाला खोडा घालण्याचा असल्याचे सांगत या प्रकरणात थोडेही तथ्य असल्यास फासावर जाण्याची तयारी असल्याचे महेबुब यांनी सांगितले. त्यांनी सोशल माध्यमातून पाठवलेल्या व्हिडिओ संदेशातून पोलिसांनी (Police) प्रकरणाच्या खोलात न जाता गुन्हा नोंदवल्याचे त्यांचे म्हणने आहे. सदरील प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब (Shaikh Mehboob) यांचे नाव असल्यामुळे मात्र खळबळ उडाली आहे.