शैक्षणिक

आज NEET परिक्षेचा निकाल ; कसा पाहाल निकाल ?

54 / 100 SEO Score

नवी दिल्ली दि.7 सप्टेंबर – आज NEET परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. एनटीए (NTA) द्वारे यावर्षी नीट ( NEET UG 2022) परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे NEET UG 2022 परीक्षेची उत्तरपत्रिका (Answer Key) दि.31 अॉगस्ट रोजी जाहिर करण्यात आली होती.

2022 यावर्षी 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG 2022 परीक्षा दिली आहे. 17 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका (Answer Key) दि.31 अॉगस्ट रोजी जाहिर असून आज दि.7 सप्टेंबर रोजी निकाल दिला जाणार आहे. NTA कडून निकालाची केवळ तारीख जाहिर करण्यात आली आहे. वेळेचा उल्लेख नसल्यामुळे सांयकाळपर्यंत निकाल (Result) घोषित होण्याची शक्यता आहे.

असा पहा निकाल…
* सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा.
* होम पेजवर दिसणार्‍या NEET UG, 2022 च्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
* मागितलेली सर्व माहिती अचुक प्रविष्ट करून येथे लॉग इन करा.
* यानंतर तुम्हाला तुमचा निकाल समोरच्या स्क्रीनवर PDF स्वरूपात दिसेल.

  • निकाल पाहून डाउनलोड करा व त्याची प्रिंट काढून घ्या.
    ( NEET Exam Result Today; How to see the result? )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!