शैक्षणिक

NEET UG 2023 … आजच NEET UG परीक्षेचा निकाल ? कसा पाहणार निकाल.

50 / 100

आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ( NTA ) NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.निकाल जाहीर झाल्यानंतर NEET ची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन निकाल पाहता येणार आहे. ( NEET UG 2023 … NEET UG Exam Result Today ? How to see the result. )

NEET UG 2023 परीक्षेचं आयोजन 7 मे 2023 रोजी करण्यात आलं होतं. यंदा सुमारे 21 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. NEET UG निकाल 2023 ( NEET 2023 ) तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर अॅप्लीकेशन नंबर आणि बर्थ डेटच्या मदतीने लॉग इन करून परिक्षार्थी त्यांचा निकाल पाहू शकतील. निकालांसोबत फायनल आन्सर-की देखील जारी केली जाऊ शकते.

कधी लागणार निकाल ?
NEET 2023 परीक्षेचा निकाल 15 किंवा 16 जूनला लागण्याची शक्यता होती, परंतू मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता निकाल आज म्हणजेच दि. 13 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. आज दुपारनंतर निकाल जाहीर होऊ शकतो. निकालासंदर्भातील सर्व अपडेट्ससाठी तुम्ही NEET ची अधिकृत वेबसाईट पाहु शकता. यासाठी, वर नमूद केलेल्या वेबसाईट व्यतिरिक्त, तुम्ही ntaresults.nic.in ला देखील भेट देऊ शकता.

निकाल जाहीर झाल्यानंतर कसा पाहाल?
1.निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही नीटची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकता.
2.येथे होमपेजवर NEET UG 2023 Result नावाची लिंक असेल, त्यावर क्लिक करा.
3.नवीन पेज ओपन होईल. या पेजवर अॅप्लीकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकावी.
4.डिटेल्स टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5.निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
6.निकाल पाहिल्यानंतर बाजुला असलेल्या प्रिंट पर्यायावर क्लिक करुन तुम्ही प्रिंट काढू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!