ओवेसींच्या हैद्राबाद मध्ये भाजपाची मुसंडी; महापालिका निवडणूकीत ७४ जागांवर आघाडी

तेलंगणाः दि.४- हैदराबाद Hyderabad महापालिका निवडणुकीची आज एलबी स्टेडियममध्ये मतमोजणी होत आहे. हैदराबाद महापालिकेच्या (GHMC) 150 जागांवर एकूण 1122 उमेदवार रिंगणात आहेत.

तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि एमआयएमच्या AIMIM बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष (BJP) मुसंडी मारत असल्याचं चित्र सुरुवातीच्या आकड्यावरुन समोर येत आहे. हैदराबाद Hyderabad महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने टीआरएसच्या जागांवर आघाडी मिळवली आहे. हैदराबाद निवडणूक निकालाची सध्या मतमोजणी सुरू आहे, त्यामध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे. 1 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 74.67 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी केवळ 34.50 लाख (46.55 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. टपाल मतपत्रिकांच्या ट्रेंडमध्ये भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे. तर टीआरएस -34, एमआयएम -18, काँग्रेस -2 जागावर आघाडीवर होते. हळूहळू कल हाती येत असून सध्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजप सध्या 74 जागांवर आघाडीवर आहे. तर टीआरएस 32, एमआयएम 13 वर पुढे आहे. सुरुवातीला आलेल्या या निकालामुळे भाजपा ४ जागावरुन पुढे जाणार हे मात्र शिकामोर्तब होत आहे.

हैदराबाद महापालिकेतील 2015 चे पक्षीय बलाबल

टीआरएस – 99 जागा

एमआयएम – 44 जागा

भाजप – 4

काँग्रेस- 2

टीडीपी- 1

इतर- 7 जागा

एकूण- 150 जागा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!