मुंडे समर्थकांचे बीडमध्ये राजीनामा सत्र; 14 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा.

बीड दि.10 जुलै – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काल जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय पटलेला आहे असं सांगत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. परंतु बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. बीड जिल्ह्यातील 14 भाजपा (BJP) पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या डॉ.प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे यातून दिसुन येत आहे.
(Munde supporters resign in Beed session; 14 office bearers resigned.)
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Union cabinet expansion) बीड जिल्ह्यात भाजपात (BJP) नाराजीचे पडसाद उमटत आहेत. काल भाजपाचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे दिला होता. यानंतर जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह इतर 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अद्याप या राजीनाम्यावर निर्णय झाला नाही. खासदार डॉ.प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भाजपातील मोठा गट नाराज असल्याचं दिसून येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी (Union cabinet expansion) प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मुंडे यांना मंत्री नाही केले तर काय झाले. ताई साहेब, आमच्या मनात आताही मंत्री आहेत. पक्ष काय इशारा देतो हे सांगायची गरज नाही राहिली. आता तरी ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा, असा संदेश सोशल मीडियातून (Social media) कार्यकर्त्यांनी गुरुवारी पसरविला होता.
पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद…
काल नाराजीच्या चर्चेनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी पुढील प्रतिक्रिया दिल्या. भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. डॉ.प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असतं. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होतं. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे.
सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजपा मला संपवत आहे असं मला वाटत नाही. मी छोटीशी कार्यकर्ता आहे त्यासाठी पंतप्रधानापासून कामाला लागतील असं वाटत नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र त्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम आहे.