शैक्षणिक

शिक्षकांच्या उपस्थिती बाबत शिक्षण संचालकांचे नवीन आदेश; नवे शैक्षणिक वर्ष सुरु.

पुणे दि.15 जून – विदर्भ वगळून राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष (Academic year) मंगळवारी 15 जूनपासून चालू झाले आहे. सध्या मुलांना शाळेत प्रवेश नसला तरी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षकांची उपस्थिती 50 टक्के तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मुख्याध्यापक व प्राचार्यांना 100 टक्के उपस्थितीचे आदेश राज्य शिक्षण संचलनालयाचे (Directorate of Education) शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी दिले आहेत.

(New order of the Director of Education regarding the presence of teachers; New academic year begins.)

इयत्ता 1 ली ते 9 वी व इयत्ता 11 वी चे 50% शिक्षकाना शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परंतु इयत्ता 10 वी व 12 वी च्या शिक्षकांची निकाल जाहीर करण्याचे काम चालू असल्याने उपस्थिती 100% असणे अनिवार्य आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थितीही 100% असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची उपस्थिती 100% असावी असेही शिक्षण संचालनालयाकडून (Directorate of Education) स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील सुचना मिळेपर्यंत शाळा बंद असल्यातरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन वा प्रशिक्षण परिषद पुणे (SERTC) यांच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे अॉनलाईन (Online) व इतर माध्यमातून विद्यार्थांचे शिक्षण सुरळीतपणे चालू राहिल याची दक्षता घ्यावी, असेही शिक्षण संचालकानी आपल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना परिस्थितीमुळे प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्या नसल्या तरी आजपासून ऑनलाईन शिक्षणाला (Online education) सुरुवात झाली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी मुलांना शाळेत जायला भेटणार नाही का? ऑनलाईन शिक्षण (Online education) किती दिवस चालणार? प्रत्यक्षात शाळा कधी उघडणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!