चिंता कायम… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.24 जूलै – बीड (Beed) आज शनिवारी जिल्हा प्रशासनाकडे 3813 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 176 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3637 जण निगेटिव्ह आली आहेत. गेली चार दिवस जिल्ह्यात आढळत असलेली बाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-47, अंबाजोगाई-4, आष्टी-40, धारुर-9, गेवराई-8, केज-16, माजलगाव-6, परळी-2, पाटोदा-20, शिरुर-20, वडवणी-4 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)
महाराष्ट्रातील परिस्थिती.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 979 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 22 हजार 485 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात गेल्या 24 तासात 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 64,46, 360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,51, 810 (13.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,52,702 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,653 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.