बीड जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश; पहा काय बंद काय सुरु.

बीड दि.24 मे – जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Collecter Ravindra Jagtap) यांनी दिनांक 25 मे ते 31 मे या कालावधीत कडक लॉकडाऊन (lockdown) वाढवण्याचे आदेश काढले आहेत. या सहा दिवसाच्या कालावधीत वैद्यकीय (Medical) सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना पूर्ण वेळ बंद राहणार आहेत. जून्या आदेशात अंशतः बदल करत केवळ हातगाड्यावरुन दररोज भाजीपाला विक्रीस सकाळी 7 ते 9 ची मुभा दिली आहे.

(New orders of Beed Collector; See what started off.)

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Collecter Ravindra Jagtap) यांनी काढलेल्या नवीन आदेशात दिनांक 15 मे 2021 रोजीच्या रात्री 12 वाजेपासून ते 25 मे 2021 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊनचे (lockdown) नवीन निर्बंध जाहिर केले आहेत. आदेशातील नवीन निर्देश पुढील प्रमाणे आहेत.

1). दिनांक 25 मे रोजीच्या रात्री 12.00 वाजेपासून ते 31 मे रोजीच्या रात्री 12 वाजेच्या दरम्यान केवळ पुढील आस्थापना पूर्णवेळ सुरु राहतील. सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसीचे उत्पादन व वितरण, सेनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इत्यादी उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.

2) दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सुरु राहील
3) भाजीपाला विक्रिस केवळ हातगाड्यावरुन दरदिवशी केवळ सकाळी 7 ते 9 परवानगी.
4) गैस वितरण दिवसभर सुरु राहील .
5) बैंक/ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते दु .1 वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोलपंप व गैस एजन्सी धारकांचे व्यवहार, ची निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार, सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार,

अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणाऱ्या आस्थापना यांना या वेळेत बैंकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल. दरम्यानच्या काळात एटीएम कैशच्या वाहनांना परवानगी असेल. तसेच दुपारी 1 ते 4.45 वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल,

6) शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील. (ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.)
7) लसीकरणा (Vaccination) करीता 45 वर्षावरील ज्या व्यक्तीचा दुसरा डोससाठी मॅसेज आला आहे . त्यांनाच लसीकरणचा (Vaccination) डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल (लसीकरणासाठी आलेला मेसेज/ आरोग्य विभागाचे पास, आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल)

8) कृषी व्यवसायाशी संबंधित बि-बियाणे , खते, औषधांची दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि-बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल, तसेच कृषि विक्रेत्याना शेतकऱ्यांस बि- बियाणे, खते, औषधे खरेदी विक्रि सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत परवानगी असेल.
9) नरेगाची कामे सुरु राहतील . या ठिकाणी सामाजिक अंतर , मास्क , सैनिटायझर चा व कोविड-19 विषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल

10) जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक 26 मे पासून सकाळी 7 ते 1 यावेळेत लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील, (राशनसाठी जाणाऱ्या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड, आधार कार्ड असणे आवश्यक आहे .)

11) जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील. दिनांक 25 मे रोजीचे रात्री 12 वाजेपासून ते 31 मे रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत अन्य असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील असे आदेशात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!