महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा प्रकार धोकादायक- डॉ. गुलेरिया

नवी दिल्ली: दि.२२- महाराष्ट्रात आढळलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचा इशारा ‘एम्स’ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज दिला.
(New type of corona in Maharashtra is dangerous- Dr. Guleria)
महाराष्ट्रात आढळणाऱ्या नव्या प्रकारामुळे प्रतिपिंडे तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉ. गुलेरिया म्हणाले. महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांमध्ये कोरोना (corona) रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे.
देशभरात कोरोनाचे (corona) २४० नवे प्रकार आढळून आले असून त्यामुळेच संसर्गात वाढ झाल्याचे महाराष्ट्राच्या कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. भारतात ८० टक्के जनतेच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण झाली तरच ‘समूह प्रतिकारशक्ती’ शक्य असल्याने भारतात ही ‘कविकल्पना’ असल्याचेही ते म्हणाले.