परळी दि.२ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प येथे मंगळवारी रात्री नव विवाहित पत्नीचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाला असून तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली असल्याची घटना घडली.
प्रियंका सायस पंडित (वय 19) व सायस पंडित वय (25 ) अशी मृत्यू पावलेल्या पती -पत्नीचे नाव आहेत. पांगरी कॅम्प येथे घटनास्थळी जाऊन परळी (Parli) ग्रामीण पोलीस (Police) निरीक्षक शिवलाल पूर्भे यांनी भेट दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प येथील प्रियंका व सायस यांचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. घरगुती कारणावरून या दोघांत वाद झाले. त्यातूनच पत्नी प्रियंका हिने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी परळी च्या रुग्णालयात आणले होते. परंतु तिचा मृत्यू झाला. रात्री अकराच्या सुमारास तिचा पती सायस पंडित यांनी रात्री पांगरी कॅम्प येथे एका घरात गळफास घेत आत्महत्या (suicide) केली. सायस यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री आणण्यात आले होते. तर बुधवारी सकाळी प्रियंकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालय येथे आणण्यात आला. पुढील तपास परळी (Parli) ग्रामीण पोलिस (Police) करत आहेत.