बीड कोरोना अपडेट; पहा तालुका निहाय आकडेवारी… राज्यात वाढ.

बीड दि.23 डिसेंबर – आज बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे 1262 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 6 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1256 जण निगेटिव्ह आहेत. आज पाच तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज घट झाली आहे. बुधवारी (दि.22) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 होती. मृत्यू संख्येत एकाने वाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2839 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 60 झाली आहे.

दरम्यान, एकीकडे देशात ओमिक्रॉनची (Omicron) दहशत असताना राज्याच्या चिंतेतदेखील आज वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्याने आढळणाऱ्या कोरोना रूग्णांचा आकडा कमी होता. मात्र, बुधवारी राज्यात 1201 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आज 953 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात सध्या 7 हजार 350 रुग्णांवर उपचार सुरु असून, 75 हजार 273 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत. तर 860 रूग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!