माझं गाव

धारुर निधन वार्ता… पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर घोळवे यांचे निधन.

किल्लेधारूर दि.11 डिसेंबर – तालुक्यातील आंबेवडगाव येथील रहिवाशी सिरसाळा पोलीस स्टेशनला (Police Station) कार्यरत पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधाकर पांडुरंग घोळवे (वय 45) वर्ष यांचे शनिवारी सकाळी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले आहे.

(News of Dharur’s demise … Death of Police Head Constable Sudhakar Gholave.)

सिरसाळा पोलीस स्टेशनला कार्यरत पो. हे. काॕ. (Police Head Constable) सुधाकर पांडूरंग घोळवे (वय 45 वर्ष) हे गेल्या अनेक वर्षांपासुन पोलिस (Police) सेवेत कार्यरत आहेत. यांचे आज शनिवारी अल्पशः आजाराने सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने धारुर (Dharur) तालुक्यातील आंबेवडगावसह सिरसाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परीवार आहे. ते गेल्याकाही दिवसांपासून आजारी असल्याचे कळते. त्यांचे परळी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत (passed away) मावळली. त्यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात आंबेवडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!