निट (NEET) परिक्षेचा निकाल १६ ला; परिक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांनाही देता येईल परिक्षा

नवी दिल्लीः दि.१२- देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘नॅशनल अलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (NEET ) परिक्षेचा निकाल १६ आक्टोंबर रोजी जाहिर होणार असून ज्यांना कोरोनाच्या निर्बधांमुळे किंवा कन्टेनमेंट क्षेत्रात राहात असल्याने परिक्षा देता आली नाही त्यांच्यासाठी येत्या १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज दि.१२ सोमवारी दिला.
कोविड प्रादुर्भावामुळे लांबलेली ‘नीट’ (NEET) परीक्षा १३ सप्टेंबर रोजी झाली. परंतु ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे किंवा जे कन्टेनमेंट क्षेत्रात होते अशा उमेदवारांना परिक्षेला बसू दिले गेले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने आज एका निकालात अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांची परिक्षा १४ आक्टोंबर रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. परिक्षेचा निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. आता आधीच्या व आता घेतल्या जाणार्या दोन्ही परिक्षांचे निकाल त्या दिवशी एकदमच जाहीर केले जावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘नीट’ (NEET) परीक्षा चा निकाल एनटीए च्या अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in व ntaneet.nic.in यावर पाहता येणार आहे.