धारुर परिसर… सावधान… तुमच्या घरावरही पडू शकते चोरांची वक्रदृष्टी.

किल्लेधारूर दि.1 नोव्हेंबर – कोरोना काळातून सावरत असताना पहिल्यांदाच दिवाळीच्या सुट्ट्या मिळत आहे. त्यामुळे अनेकजण दिवाळी (Diwali) साजरी करण्यासाठी मूळ गावी किंवा कुठे पर्यटनाला जाण्याच्या तयारीत आहेत. पण असे घराला कुलूप लावून जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण कुलूपबंद घरांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्यास सुट्ट्यांची मजा घेण्याऐवजी ती सजा ठरण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन धारुर पोलिस (Police) ठाण्याचे प्रभारी स.पो.नि. नितिन पाटील यांनी केले आहे.
(Dharur area … Caution … The crooked gaze of thieves can fall on your house too.)
शाळकरी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता नोकरी करणाऱ्या पालकांनाही नवीन आठवड्यात सुट्ट्या मिळतील. त्यामुळे कर्मचारी वर्ग सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातील. अशा वेळी घराला कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नेमकी हीच संधी हेरून चोरटे घरफोडी करण्याची शक्यता असते. अशा वेळी गावाला जाणार असाल तर शेजाऱ्याला घरावर नजर ठेवण्याची प्रेमळ सूचना अवश्य करा. अन्यथा चोरटे आपला कार्यभाग उरकून निघूनही जातील, ते गावावरून परत आल्याशिवाय काही कळणार नाही.
काेराेनाकाळ (Corona) सुरू झाल्यापासून अनेक लाेक सुट्या घेऊन पर्यटनाला गेले नाहीत. गेल्यावर्षी काेराेनामुळे अनेकांच्या सुट्या घरातच गेल्या. यावर्षी मात्र सुट्यांचा पुरेपूर आनंद घेण्याच्या मन:स्थितीत अनेकजण आहेत. त्यामुळे घराला अनेक दिवस कुलूप राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घेत चाेरटे घरफाेडी करण्याची शक्यता असल्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.
दागिने घरी न ठेवलेलेच बरे
बंद घरांमध्ये चोरटे कसा प्रवेश करणार याची कल्पना आपण करू शकत नाही. अशा वेळी चोरटे घरात शिरलेच तर घरात त्यांना मौल्यवान वस्तू, दागिने मिळू नये याची दक्षता घ्या. शक्यतो दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा सुरक्षितपणे सोबत न्या.
घराला कुलूप लावून जाण्यापूर्वी अशी घ्या काळजी …
➡ दिवाळी सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी जाताना अंगावरील सोने मौल्यवान वस्तु झाकुन ठेवावे .सोनसाखळी चोरांपासुन सावध रहावे.
➡ATM व बँकेतुन पैसे काढल्यानंतर पैसे सुरक्षित ठेवावे.पैसे कोणी हिसकाघरालावुन अथवा बहाना करुन नेणार नाही याची दक्षता घ्यावी.
➡ आपले वाहन सुरक्षीत ठिकाणी पार्क करावे .ज्या ठिकाणी पार्किग सुविधा व सी.सी.टि.व्ही.कँमेरे (CCTV) ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी मोटार सायकल पार्क करावी.
➡आपले वाहनात मौल्यवान वस्तु ठेवु नये. जेणेकरुन बँग लिप्टिग अथवा चोरी होणार नाही.
➡ नागरिकांनी गावात घर असेल तर शक्यतो शेत वस्तीवर राहु नये…शेत मालापेक्षा जीव खुप मौल्यवाण आहे.
➡शेत वस्तीवर दूर – दुर घरे असल्यास सर्वांनी मिळून एक मोठ्याने वाजनारे यंत्र तयार करावे व ते सर्व घराचे मध्यभागी बसवून त्याचे कनेक्शन सर्वांकडे ठेवावे…काही घटना घडत असल्यास ते यंत्र वाजवून सर्वांना जागी करता येईल.. त्यामुळे एकमेकांना मदत होईल…
➡ ज्यांना शक्य आहे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत ..
➡ गावातील पोलिस पाटील, सरपंच , उपसरपंच व तरुण मुलांनी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवावा …त्यामुळे लहान मोठया काही घटना घडल्यास तात्काळ माहिती मिळेल ..
➡ सरपंचांनी पुढाकार घेऊन ग्राम रक्षक दल स्थापन करून त्यांचा पोलिसांबरोबर पाठपुरावा करावा…तसेच त्यांना लाठ्या,शिट्या व इतर साहित्य पुरवावे .
➡ नागरिकांनी सणानिमित्त बाहेरगावी जाताना शेजारच्या नागरिकांना माहिती देऊन जावे व एकमेकांचे फोन नंबर्स माहिती असावे …
➡ घरात जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये तसेच अंगावर दागिने घालू नयेत ते बँकेत सुरक्षीत लाँकरमध्ये ठेवावेत.
➡ दिवसा अनोळखी व्यक्ती गावात किंवा शेत वस्तीवर रेकी करताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी …
➡ आपण केलेला मोठा अार्थिक व्यवहार ईतरांना माहित होणार नाही याची काळजी घ्यावी…
➡ कोणताही आर्थिक व्यवहार किंवा ईतर खरेदी -विक्री मधून मिळालेले पैसे घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत (Bank) जमा करावे ..
➡ सर्वांनी सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तूंची व त्या पेक्षाही मौल्यवान म्हणजे आपल्या जीवाची सुरक्षा करावी…
➡महिलांनी बाजार,गर्दीच्या ठिकाणी ,लग्न व ईतर कार्यक्रमाला जाताना कमीत- कमी दागिने घालून जावे.. कारण या ठिकाणी चोरट्यांची नजर दागिन्यावर पडल्यास ते घरापर्यन्त रेकी करीत येवू शकतात.
➡बतावणी-पुढे पोलिस आहेत तपासणी चालु आहे,पुढे खुन झाला आहे.तुमच्या अंगावरील सोने काढुन द्या अशी बतावणी करुन फसवणुक केली जाते.अशा व्यक्तीपासुन सावध रहावे. आपल्याकडिल वस्तु कोणालाही काढुन देऊ नये, एकटे फिरु नये, सतर्क रहावे, कोणतीही घटना अथवा माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिस स्टेशन धारूर Police station Dharur) फोन नंबर. 02445-274138 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.