घात अपघात

भीषण अपघात; अन तीन मित्रांनी जीव गमावला…

बीड दि.3 मार्च – एक चूक तिन मित्रांच्या जीवावर बेतली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला एसटी बसने (ST bus) समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीवरील तीन तरुण मित्र ठार झाले. ही घटना 2 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता धुळे- सोलापूर महामार्गावरील बीडनजीकच्या आहेर वडगाव फाट्याजवळ घडली.

( Terrible accident; Three friends lost their lives … )

या भीषण अपघातात कृष्णा भरत शेळके (22, रा. दगडी शहाजानपूर, ता. बीड), पारसनाथ मनोहर राेहिटे (21, रा. आहेरवडगाव, ता. बीड) व अक्षय सुरेश मुळे (25, रा. घोडका राजुरी, ता. बीड) या तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे तिन तरुण आहेरवडगाव फाट्यावरून विरुद्ध दिशेने बुलेट या दुचाकीवरून (एमएच 24 – एल 7227) येत होते. यावेळी औरंगाबाद आगाराची औरंगाबाद – लातूर बस ( एमएच 14 – बीटी 2455) बीडहून लातूरकडे (Beed Latur) जात होती.

अचानक दुचाकी समोर आल्याने चालकाचा ताबा सुटला. यावेळी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. पारसनाथ रोहिटे व कृष्णा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय मुळे याने जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री साडेआठ वाजता प्राण सोडले.

दरम्यान, घटनास्थळी बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) संतोष साबळे यांनी भेट दिली. साबळे व सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघात एवढा भीषण होता, की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. हुंदके व अश्रूंमुळे वातावरण सुन्न झाले होते.

जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अक्षय मुळे याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याचा मृत्यू झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी धाव घेत पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जाधव, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. अरविंद वाव्हळ, डॉ. शुभम मासाळ यांनी तपासणी व उपचार केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!