BEED24

आता ‘या’ कारणाने बीड जिल्हा चर्चेत; आरोग्य व महसुल प्रशासनाचा सावळा गोंधळ.

अंबाजोगाई दि.25 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा पुन्हा नव्या कारणाने चर्चेत आला असून पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपुर्वी अंबाजोगाईत (Ambajogai) अल्पवयीन मुलीच्या अत्याचारारी घटना घडल्यानंतर आता कोरोना मृत्यूत बोगस नावे लावण्याचा प्रकार समोर आला.

(Now Beed district is under discussion for this reason; The shadow of health and revenue administration.)

अंबाजोगाई तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 316 जणांची माहिती आरोग्य विभागाकडे (Health Department) आहे. मात्र आता या यादीत 532 नावे आली आहेत. इतकेच नव्हे तर अंबाजोगाईत जीवंत व्यक्तींचीही नावे मयतांच्या यादीत समाविष्ट झाल्याने आरोग्य व महसुल प्रशासनाचा (Revenue Department) सावळा गोंधळ पुन्हा समोर आला आहे.

कोरोनाच्या प्रादूर्भावाने मृत्यू (Corona death) पावलेल्या व्यक्तींना शासनातर्फे 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला. तसेच “मिशन वात्सल्य” या निर्णयानुसार आता महसुल व स्थानिक प्रशासन कोरोनातील मयत व्यक्तींची यादी तयार करत आहेत. या यादीची खातरजमा करण्यासाठी अंबाजोगाई शहरातील मयतांची यादी अंबाजोगाई चे तहसीलदार विपिन पाटील यांनी अंबाजोगाई चे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पाठविली.

नगर परिषदेच्या वतीने या यादीची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी करत असताना अनेक गंभीर बाबी समोर येऊ लागल्या आहेत. अंबाजोगाई शहरात जीवंत असणाऱ्या व्यक्तींचाही मयत म्हणून समावेश आहे. येथील प्रशांतनगर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार नागनाथ वारद यांचेही नाव मयतांच्या यादीत आले. नगरपरिषदेचे कर्मचारी नागनाथ वारद यांच्या कुटुंबाकडे खातरजमा करण्यासाठी गेले.

यावेळी खुद्द नागनाथ वारद यांनाच आपले नाव मयतांच्या यादीत समाविष्ट असल्याचा धक्काच त्यांना बसला. हा प्रकार पाहून नगरपरिषदेचे पडताळणी करण्यासाठी गेलेले कर्मचारी ही आवाक झाले. असाच प्रकार त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या कुंटुबांशी ही घडला. जीवंत व्यक्तींची नावे मयतांच्या यादीत समाविष्टच झाली कशी? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

 

Exit mobile version