कोरोंना विशेष

कोरोनाच्या सौम्य लक्षणावर घरगुती उपाय; करा रोगप्रतिकारशक्ती मजबूत.

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान घातले आहे. यातच तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ञ व्यक्त करत आहेत. देशभर सध्या लसीकरण (Vaccination) मोहिम सुरु केली असली तरी यास बाधा येत आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने लसीकरणाचा (Vaccination) वेग मंदावला आहे. अशा वेळी लोकांत रोगप्रतिकारशक्ती वाढविणे व कोरोनाच्या सौम्य लक्षणे (Mild Symptoms) असलेल्यावर घरगुती उपाय रामबाण औषध ठरु शकते.

(Home remedies for mild symptoms of corona; Strengthen the immune system.)

भारतात कोरोना विषाणूने (Corona virus) आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर दररोज चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. देशातील हे मृत्यूचे तांडव कधी थांबणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अर्थात विषाणू संसर्गाची काळजी भलतीच वाढली आहे.

देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे (Corona vaccine) प्रमाण फारच कमी आहेत. त्यामुळे सध्यातरी खबरदारी हाच कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग रोखण्यास आणि संसर्गावर मात करण्यास सर्वोत्तम उपाय आहे.

एखाद्या व्यक्तीला झालेल्या कोरोना लागणची लक्षणे सौम्य (Mild Symptoms) असतील, तर या विषाणूवर सहजासहजी घरगुती उपायांनीच (Home remedies) मात करू शकता. तज्ज्ञांचा सल्ला घेवून काही घरगुती उपायांच्या सहाय्याने कोरोनाची सौम्य लक्षणे दूर करू शकता. तसेच रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करता येते.

कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) घेतल्यानंतर लोक बिनधास्त वावरतात. मात्र त्यानंतरही अनेकांना विषाणूची लागण होत आहे. त्यामुळे विषाणूला हलक्यात घेऊन चालणार नाही. अनेक लोक ताप, खोकला आणि सर्दी अशा सामान्य लक्षणांना सामोरे जात आहेत.

हे घरगुती उपाय करा
– सौम्य लक्षणांवर काढा प्या. हा एक सर्वोत्तम उपाय आहे.
– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, एखाद्या व्यक्तीस सर्दी, खोकला आणि हलका स्वरुपाचा ताप जाणवत असेल तर ताबडतोब काढा पिण्यास सुरूवात करा.
– काढा करण्यासाठी आल्याचे तुकडे करून ते पाण्यात उकळवा. नंतर त्यात तुळशीची पाने घाला आणि हे मिश्रण दिवसातून तीन ते चार वेळा प्या.

ताजे अन्न खा
– जर आपल्याला सर्दी, खोकला किंवा थकवा येत असेल तर फक्त ताजे, शिजवलेले गरम जेवण घ्या.
– जेवणात मीठ आणि तेल न घालता मूगाच्या डाळीचे सूप प्या.
– गरजेपेक्षा अधिक खाऊ नका.
– कोरोनाची लक्षणे टाळण्यासाठी शक्यतो रात्री सात वाजण्याच्या आधी जेवा. त्यामुळे रिकव्हरी अर्थात कोरोनातून वेळीच बरे होता येते.

या मसाल्यांचा वापर करा
जर तुम्हाला कधी ताप, थकवा, सर्दी, खोकला येत असेल तर दालचिनी, मिरपूड, वेलची आणि लवंग यांसारख्या मसाल्यांचा वापर करा.
– जेवणात हळद आणि आले मिसळल्यानेही मोठा आराम मिळतो. यामुळे आपल्याला सर्दी किंवा खोकल्याचा त्रास झाला असेल तर त्यापासून लवकरच आराम मिळेल.
– आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे या मसाल्यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दूर करण्याची प्रचंड क्षमता आहे.

या भाज्या आहेत फायदेशीर 
– हलकीशी सर्दी झाल्यास भाज्या खाण्यास सुरुवात करा.
– लक्षात ठेवा की भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या पाहिजेत.
– कच्ची कोशिंबीर आणि भाज्या टाळा.
– कडू कारल्याचा जेवणात समावेश करा.
– काही दिवसांसाठी वांगे, टोमॅटो, बटाटा यांचे सेवन कमी करा.
– धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!