आता धारुर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट; तीन स्वतंत्र पथकाची नियुक्ती.

किल्लेधारूर दि.4 मे – लॉकडाऊन (lockdown) असताना शिथिल वेळानंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धारुरमध्ये अँटिजेन टेस्ट (Antigen Test) करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदरील मोहीम सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी आज काढले आहेत.
(Now the antigen test of the wanderers in Dharur city for no reason; Appointment of three separate squads.)
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यासंदर्भात आदेश काढून कठोर अमंलबजावणीचे संकेत दिले होते. कडक लॉकडाऊनच्या (lockdown) पार्श्वभूमीवर तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. प्रशासनाने विनाकारण जे बाहेर येतील त्यांची ॲन्टीजन टेस्ट आणि दंड आकारण्यासाठी तीन पथकांची नेमणूक केली आहे.
या कारवाईसाठी महसूल, पालिका, आरोग्य व पोलिस प्रशासनाने संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाजी चौक ते तेलगाव रोड व परिसर, शिवाजी चौक ते आडस रोड व परिसर आणि शिवाजी चौक ते केज रोड व परिसर अशा तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय प्रशासकीय अधिकारी इतर भागात फिरत्या पथकात गस्तीवर असणार आहेत.
शहरात रस्त्यावर मोकार फिरणाऱ्या लोकांवर थेट ॲन्टीजन तपासणी (Antigen Test) करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वंदना शिडोळकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितिन बागुल, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिली. लोकांनी उद्यापासून तीन दिवस संपुर्ण निर्बंधात बाहेर येवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. यापुर्वी केज, बीड व अंबाजोगाई शहरात मोकार फिरणाऱ्या सडक सख्याहरींवर ॲन्टीजन तपासणीची कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.