नर्सची आत्महत्या; अवैध गर्भपात प्रकरणात होती फरार आरोपी.

बीड दि.8 जुन – अवैध गर्भपात (illegal abortion) प्रकरणात आरोपी असलेल्या नर्सचा मृतदेह पाली तलावात 8 जून रोजी आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सीमा सुरेश डोंगरे (३६, रा. डीपी रोड शिक्षक कॉलनी, बीड) असे मयत नर्सचे नाव आहे.

सीता गणेश गाडे ( रा. बक्करवाडी ता. गेवराई) या महिलेचा तीन मुलीनंतर अवैध गर्भपात करण्यात आला होता. अति रक्तस्त्राव होऊन 5 जून रोजी तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अवैध गर्भपात प्रकरणात 7 जून रोजी पोलीस (Police) व आरोग्य विभाग यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिस (Police) उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी पती, सासरा, भाऊ, अंगणवाडी सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ताब्यात असून याप्रकरणी फरार आरोपीत सीमा डोंगरे यांचा समावेश होता. आज पाली तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी बीड (Beed) ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पो.हे.कॉ. आनंद मस्के यांनी भेट दिली.

( Nurse suicide; The accused was absconding in an illegal abortion case. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!