obscene सख्खा दिर निघाला पक्का वैरी ; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारुर दि.25 एप्रिल – सख्खा दिर पक्का वैरी निघाल्याचे धारुर तालुक्यातील एका गावात घडलेल्या घटनेने समोर आले आहे. तू मला खूप आवडतेस म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची (obscene) मागणी केल्याची ही धक्कादायक घटना घडली.
( obscene … Brother in law turned out to be a strong enemy; Incidents in Dharur Taluka. )
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर (Dharur) तालुक्यातील एका गावात पीडित महिला आपल्या घरातील बाथरुममध्ये आंघोळ करत होती. तेव्हा या महिलेचा सख्खा दीर बाथरुममध्ये शिरला आणि त्याने बळजबरीने अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. “तू मला खूप आवडतेस” म्हणत त्याने वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. अचानक ओढावलेल्या प्रसंगाला सामोरे जात महिलेने नकार दिला व आरडाओरडा केला. दिराने यावेळी पीडितेला धमकी दिली.
प्रसंगावधान बघून महिलेने आरडाओरडा केल्यामुळे शेजारील लोक गोळा झाले. शेजारील लोक जमा होत असल्याचे लक्षात येताच दिराने तेथून पळ काढला. पीडित महिला ही विधवा असून ती गावातील शेतात आपल्या 14 वर्षीय मुलासोबत राहते. दरम्यान पीडितेच्या तक्रारी वरुन दिंद्रुड पोलिसांत (Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे मात्र संताप व्यक्त केला जात आहे.