बीड जिल्ह्यातील ‘या’ आमदाराचीही बिनविरोध ग्रामपंचायतींना अॉफर

बीड: दि.२३ (प्रतिनिधी) राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat Election) धुराळा सुरु झाला असून अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु केली आहेत. कोरोना संकटाच्या काळात ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) बिनविरोध केली तर लाखो रुपयांचं बक्षीस विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जाहीर करुन टाकलं आहे. आजपासून नामनिर्देशपत्र भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अशात आष्टी, पाटोदा, शिरुर मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास २१ लाखांचा निधी देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे (NCP) आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajabe) यांनी केली आहे. .
बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, शिरुर मतदारसंघात २३ ग्रामपंचायती्च्या निवडणुका होत आहेत. बिनविरोध निवडणूक घेणाऱ्या ग्रामपंचायतींना आगामी पाच वर्षांच्या काळासाठी प्रत्येकी २१ लाख रुपये विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा आ. बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajabe) यांनी केली आहे. यातील १० लाखांचा निधी आमदार निधीतून तर ११ लाखांचा निधी कंपनी विकास निधीतून (सीएसआर फंड) देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामस्थांनी आपापसातील मतभेद, भांडणतंटे, पक्षीय विचार बाजूला ठेऊन गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुक बिनविरोध कराव्यात असे आवाहनही आ.आजबे यांनी केलं आहे. आता राष्ट्रवादीचे (NCP) आ. आजबे यांच्या आवाहनाला मतदारसंघातील किती ग्रामपंचायतींचा प्रतिसाद मिळतो हे पुढील आठवडाभरात स्पष्ट होणार आहे .