अरे देवा … महाराष्ट्रात पुन्हा दुर्दैवी घटनेत 13 जणांचा मृत्यू; विरारमध्ये रुग्णालयात आग.

मुंबई दि.23 एप्रिल – दोन दिवसांपुर्वीच नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची दुर्घटना घडली. कोविड केअर सेंटरमध्ये ही आग लागली आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये 13 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू (Patient death) झाला आहे.
(Oh my God … 13 people die in unfortunate incident in Maharashtra again; Hospital fire in Virar.)
चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात 17 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण उपचार घेत होते. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान अग्निशमन दल (Fire brigade) आणि पोलिसांनी (Police) आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर 4 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री 3 वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षता (ICU) विभागातील 13 रुग्णांचा मृत्यू (Patient death) झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. अग्निशमन विभागाने (Fire brigade) आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम केले. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते. केवळ स्थानिक पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले.
मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. मृतांची नावं -उमा सुरेश कनगुटकर, निलेश भोईर, पुखराज वल्लभदास वैष्णव, रजनी आर कडू, नरेंद्र शंकर शिंदे, जनार्दन मोरेश्वर म्हात्रे, कुमार किशोर दोशी, रमेश टी उपयान, प्रविण शिवलाल गोडा,
अमेय राजेश राऊत, रामा अण्णा म्हात्रे, सुवर्णा एस पितळे, सुप्रिया देशमुखे यांचा मृतांत समावेश आहे.