बीड दि.15 मार्च – बीड जिल्ह्यात आज दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. यात एका घटनेत जिल्हा रुग्णालयाच्या (Civil Hospital) इमारतीवरून उडी मारून शेतकऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची तर दुसऱ्या घटनेत बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथील रोहित्राचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका युवकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.
(One commits suicide by jumping from district hospital building in Beed; In another incident, a youth was killed in Rohitra’s blast)
बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) उपचार सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांने सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणाने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय. काही दिवसांपूर्वी याच शेतकऱ्यानं पुण्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला होता. सदरील मृत शेतकऱ्यांचे नाव अबोल भोसले असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सावरगाव येथील असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पेठ बीड पोलिसांनी (Police) भेट देवून पुढील तपास करत आहेत.
रोहित्राच्या स्फोटात युवक ठार
बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथील गणेश सुनिल तावरे (20) हा जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीजवळ गेला होता. वीज नसल्यामुळे तो रोहित्राजवळ जाऊन फ्यूज टाकण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक रोहित्राचा स्फोट झाला आणि या स्फोटात या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
रोहित्राला चिटकल्याने गणेश पूर्णपणे जळून खाक झाला होता. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी (Police) धाव घेतली. रोहित्राचा स्फोट कशामुळे झाला याचा शोध सुरू आहे.