नोकरी विषयक

Territorial Army Recruitment माजी सैनिकांसाठी प्रादेशिक सेनेत 55 पदांकरिता भरती.

63 / 100

बीड दि.23 मार्च (2025) – ( Territorial Army Recruitment ) 136 पैदल वाहिनी प्रादेशिक सेनेतील पर्यावरण महार बटालियनमध्ये माजी सैनिक तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालय, राज्य शासनाच्या (वनविभाग) मधील सेवानिवृत्त महिलांसाठी 21 ते 23 एप्रिल 2025 या कालावधीत एसआरपीएफ (SRPF) कॅम्प मैदान, धुळे येथे सैन्यभरती आयोजित केले आहे. या भरतीत पात्र उमेदवारांनी 21 एप्रिल,2025 रोजी सकाळी 5.30 वाजता धुळे येथील एसआरपीएफ मैदान येथे शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन लेफ्टनंट कमांडर प्रभू अमित सी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी 44 पदे फक्त महाराष्ट्रातील माजी सैनिक तसेच सेवानिवृत्त महिला वन पर्यावरण मंत्रालय केंद्र शासन तसेच वन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेसाठी ही भरती होईल. लिपिक 6 पदे,स्वयंपाकी 1, न्हावी 1, मेस किपर 1, वेटर 1, वेल्डर ब्लॅकस्मित 1 या पदांसाठी संपूर्ण भारतातील माजी क्लार्क तसेच माजी सैनिक ट्रेड्मन अर्ज करू शकतात. भरतीसाठी पात्रता : माजी सैनिक आणि सेवानिवृत्त महिलांची वयोमर्यादा 50 वर्षांपेक्षा जास्त नसावी. माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

वैद्यकीय श्रेणी : चारित्र्य, डिस्चार्ज बुकनुसार अनुकरणीय खूप चांगले असावे. माजी सैनिक आणि पर्यावरण मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी, केंद्र आणि राज्य शासनाच्या वन विभागामध्ये 20 वर्षांच्या सेवेसह स्वेच्छेने सेवानिवृत्त झालेले असावे. माजी सैनिकांसाठी उंची 160 से.मी. माजी महिला कर्मचारी 150 से.मी. असावे. माजी सैनिकांचे वजन 50 किलो तर माजी महिला कर्मचाऱ्यांचे वजन 42 किलो असावे.

शारीरिक चाचणी फक्त पुरुषांसाठी एक मैल दौड, 8 ते 9 फुट खड्डा, बीम आणि बॅलन्स वॉक पार करावे लागतील. भरती प्रक्रिया करणारे अधिकाऱ्यांमार्फत मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी करून महिलांची भरती केली जाईल. भरतीसाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), डिस्चार्ज बुक, ईएसएम आयडेन्टी कार्ड, पासपोर्ट आकाराचे 8 छायाचित्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आणावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!