टमटम आणि मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू; केज तालुक्यातील घटना.

केज दि.16 अॉक्टोंबर – केज तालुक्यातील विडा येथे टमटम आणि मोटारसायकल याची समोरासमोर धडक झाली. या अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
(One killed in tumtum and motorcycle accident; Incidents in Kaij taluka.)
केज (Kaij) तालुक्यातील येवता तांडा येथील सचिन अर्जुन राठोड अंदाजे वय 20 वर्षे हा तरुण आपल्या मोटारसायकल वरुन जात होता. दुपारी विड्यातील तलावाजवळ आला असता वळणावर टमटम व मोटारसायकलचा अपघात झाला. यात सचिन राठोड यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
स्थानिकांनी गंभीर जखमी युवकास उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत अद्याप पोलिसांत (Police) नोंद झाली नव्हती.