युवकाची एक लाख रुपयांना अॉनलाईन फसवणूक

बीड : दि.२५- ‘फोन पे’वरून पाठविलेले पाच हजार रुपये खात्यावर जमा झाले नसल्याने. बीडच्या एका युवकाने इंटरनेटवरून ‘फोन पे’ (Phone pay) च्या कस्टमर केअरचा नंबर गुगलवरून (Google) घेतला. मात्र सदरील नंबर बनावट निघाला. सदरील नंबर वरुन भामट्याने चुकीची माहिती देत त्या युवकाच्या खात्यावरून एक लाख रुपये काढून घेतल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

शासनाने सध्या नगदी चलनापेक्षा अॉनलाईन (Online) व्यवहारांना पसंती दिली असून या अॉनलाईन (Online) प्रकारात फसवणूकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. बीडमध्ये फसवणुकीचा हा प्रकार १४ डिसेंबर रोजी घडला होता. बाजीराव सुंदर जाधव (रा. संत नामदेवनगर, धानोरा रोड, बीड) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा भाऊ दत्ता मोहन जाधव याने १४ डिसेंबर रोजी बाजीरावच्या फोन नंबरवर पाच हजार रुपये पाठविले होते. परंतु, ही रक्कम बाजीरावला मिळाली नसल्याने त्याबाबत तक्रार करण्यासाठी त्याने इंटरनेटवर ‘फोन’पे (Phone pay) च्या कस्टमर केअरचा नंबर गुगलवर (Google)) शोधला असता त्याला फोनपेच्या बनावट कस्टमर केअरचा नंबर मिळाला. त्या नंबरवरून बोलणाऱ्या राहुलकुमार या भामट्याने बाजीरावला बोलण्यात गुंतवून आधी त्याच्या खात्यावरील शिल्लक रक्कम विचारून घेतली. त्यानंतर बाजीरावला चुकीची माहिती देत फोन पेद्वारे त्याच्या खात्यातून ९८ हजार ८५२ रुपये काढून घेतले आणि २४ तासांत ही रक्कम पुन्हा खात्यावर जमा होईल, असे सांगितले. परंतु, आठ दिवसानंतरही पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे बाजीरावच्या लक्षात आले. याप्रकरणी बाजीराव जाधव याच्या फिर्यादीवरून राहुलकुमार नामक भामट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक ठोंबरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!