शैक्षणिक

बापरे…दोन दिवसात २२ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह…

शिरूर कासार: दि.२४- २७ जानेवारी पासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्या अनुषंगाने शिक्षकांची कोरोना (Corona) चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. शिरुर तालुक्यात शिक्षण विभागाकडून शुक्रवार व शनिवारी दोन दिवसांत २०४ शिक्षकांनी तपासणी करून घेतली. यात २२ शिक्षकांचा (Teacher) अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आल्याची माहिती गटशिक्षण कार्यालयाकडून देण्यात आली.

तालुक्यातील रायमोह, तागडगांव, पांगरी, शिरूर कन्या शाळा, मानुर व जाटनांदूर या सहा केंद्रांतील २०४ शिक्षकांची तपासणी करण्यात आली, पैकी २२ शिक्षक (Teacher) हे कोरोना पाॅझिटिव्ह (Positive) निघाले आहेत. बारा केंद्रांतर्गत ४०५ शिक्षक असून, २०४ शिक्षकांची तपासणी झाली. उर्वरित हिवरसिंगा, खालापुरी, आर्वी, तिंतरवणी, फुलसांगवी व गोमळवाडा केंद्रातील शिक्षकांची चाचणी आणखी होणे आहे. शाळा सुरू होणार असल्याने, मुलांच्या व शिक्षकांच्या सुरक्षेसाठी कोरोना चाचणी आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना (Corona) चाचणी केली जात असून खबरदारीचे सर्व नियम पाळण्यात येत असल्याचे गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!