opinion poll काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज ? महायुती की महाविकास आघाडी… ?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रीज (times now matrize opinion poll) चा ओपिनियन पोल समोर आला आहे. ओपिनियनच्या पोलनुसार भाजपच्या जागा घटणार असल्या तरी महायुतीला 137-152 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळू शकतात, ओपिनियन पोलच्या (opinion poll) अंदाजानुसार महायुती व महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
कोणाला किती जागा ? कंसात मतांची टक्केवारी
भाजप – 83-93 (26.2)
शिवसेना (शिंदे) – 42-52 (16.4)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 07-12 (2.8)
काँग्रेस – 58-68 (16.2)
शिवसेना (ठाकरे) – 26-31 (14.2)
राष्ट्रवादी (शरद पवार) – 35-45 (13.7)
अन्य – 03-08 (10.1)म
हाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्यास?
सरकारात्मक परिणाम होईल – 29 टक्के
नुकसान होऊ शकते – 43 टक्के
विशेष परिणाम होणार नाही – 14 टक्के
सांगता येत नाही – 14 टक्के
अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात का?
होय – 43 टक्के
नाही – 33 टक्के
सांगता येत नाही – 22 टक्के
अजित पवारांसोबतच्या युतीवर भाजप आणि आरएसएस मतभेदांचा परिणाम होईल का?
परिणाम होणार नाही – 36 टक्के
प्रचंड परिणाम होईल – 39 टक्के
काही प्रमाणात परिणाम होईल – 22 टक्के
सांगता येत नाही – 3 टक्के
मराठा आरक्षण मुद्द्याचा महायुतीवर काय परिणाम होईल?
नुकसान हाईल – 34 टक्के
फायदा होईल – 24 टक्के
कोणताही परिणाम होणार नाही – 31 टक्के
सांगता येत नाही – 11 टक्के
माझी लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवर किती परिणाम होईल?
खूप जास्त परिणाम होईल – 58 टक्के
काही प्रमाणात परिणामकारक – 24 टक्के
कोणताही फायदा होणार नाही – 6 टक्के
माहिती नाही/ सांगू शकत नाही – 5 टक्के
लाडका भाऊ (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) योजनेचा किती परिणाम होईल?
चांगला परिणाम होईल – 36 टक्के
काही प्रमाणात परिणाम होईल – 33 टक्के
कोणताही परिणाम होणार नाही – 22 टक्के
सांगता येत नाही – 9 टक्के
मुख्यमंत्रिपदासाठी तुमचा आवडता चेहरा कोण?
एकनाथ शिंदे – 37 टक्के
उद्धव ठाकरे – 21 टक्के
देवेंद्र फडणवीस – 21 टक्के
शरद पवार – 10 टक्के
इतर – 11 टक्के
दलित मतदारांची पसंती असलेली आघाडी कोणती?
महायुती – 43 टक्के
महाविकास आघाडी – 32 टक्के
इतर आघाडी – 21 टक्के
सांगू शकत नाही – 4 टक्के
आदिवासी मतदारांची आवडती आघाडी कोणती?
महाविकास आघाडी – 42 टक्के
महायुती – 34 टक्के
इतर आघाडी – 14 टक्के
सांगता येत नाही – 10 टक्के