संभाव्य औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीत नाव नोंदणीची संधी

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) बिहार Bihar निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या काही दिवसांतच भारत निवडणूक आयोगाकडून (election commission) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने धारूर (Dharur) तालुक्यातील पदवीधर मतदार नोंदणीसाठी सर्व पात्र पदवीधर (1 नोव्हेंबर 2016 रोजी पदवी पूर्ण असणारे) ज्यांनी अद्याप मतदार नोंदणी केली नसल्यास तात्काळ विहित अर्ज व कागदपत्रे सादर करून आपापली नाव नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक (election) विभाग प्रमुख नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.

यासाठी फॉर्म न 18 (तहसील कार्यालयात उपलब्ध), मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पदवी प्रमाणपत्र/शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, लाईट बिल/फोन बिलची झेरॉक्स इ.कागदपत्रे आवश्यक आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 2593 व्यक्तींची नाव नोंदणी झाली असून ही संख्या गतवेळी पेक्षा जास्त असली तरीही तालुक्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता कमीच आहे. एकूण लोकसंख्येच्या साधारणतः 5 % इतक्या प्रमाणात व्यक्ती पदवी पर्यंतचे शिक्षण घेतात असे एक सर्वेक्षण सांगते. आपल्या तालुक्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे 1.5 लाखाच्या घरात असून त्याच्या 5% म्हणजे साधारणतः 7500 इतकी नाव नोंदणी होणे अपेक्षित आहे. परंतु सध्या केवळ 2593 इतकीच नाव नोंदणी झालेली आहे. तसेच यामध्ये महिलांची नोंदणी अत्यल्प म्हणजे केवळ 366 इतकीच आहे. अजूनही तालुक्यात बरेच पात्र पदवीधर नोंदणी पासून वंचीत असून अशा सर्वांनी पुढील 2-3 दिवसांत निवडणूक विभाग, तहसील कार्यालय धारूर (Dharur) येथे संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी ही विनंती. योग्य व अचूक उमेदवाराची निवड होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करणे व मतदानाचा हक्क बजावणे सुदृढ लोकशाही (democracy) साठी आवश्यक आहे. तालुक्यातील पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नाव नोंदणी करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे व आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक (election) विभाग धारूर (Dharur) तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!