BEED24

आजारातून बरे करण्याचे अमिष दाखवुन विवाहितेवर अत्याचार; अंबाजोगाईतील घटना.

अंबाजोगाई दि.11 अॉक्टोंबर – आजारातून बरे करण्याचे अमिष दाखवुन एका विवाहितेवर अत्याचार (Rape) केल्याची घटना 25 सप्टेंबर ते 8 आॅक्टोबर या कालावधीत देन वेगवेगळ्या ठिकाणी घडली. याप्रकरणी सदरील पिडीत महिलेच्या तक्रारी वरुन अंबाजोगाई (Ambajogai) ग्रामीण पोलीस ठाण्यात (Police station) गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

(Oppression of the married woman by showing the lure of healing from illness; Incidents in Ambajogai.)

कृष्णा पिराजी मस्के असे त्या आरोपीचे नाव आहे. पिडीतेच्या फिर्यादीनुसार (complaint) ती आपल्या पतीसह एका ठिकाणी कामास होती . त्या ठिकाणी कामास असलेल्या कृष्णा पिराजी मस्के या मजुराने या महिलेस तुझा आजार बरा करतो असे अमिष दाखवुन बाहेरगावी उजगाव ता. बेळगाव कर्नाटक येथे नेले. सदरील महिलेवर तिथे व वापस आल्यावर घाटनांदूर येथे अत्याचार केले.

हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेत सदरील महिलेने दिलेल्या अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन आरोपी कृष्णा पिराजी मस्के याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पिंक पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) वैशाली पेटकर या करीत आहेत.

Exit mobile version