Guru Poornima धारुरात सोमवारी गुरुपौर्णीमा उत्सव व पुरस्कार वितरण सोहळा ; प.पु. आशिष महाराजांची उपस्थिती.

किल्लेधारुर दि.2 जुलै – Guru Poornima सोमवार दि.3 जुलै गुरु पोर्णीमा अर्थात व्यासपोर्णीमा निमीत्त 12 भाषेत कथा व किर्तन करणारे धारूर Dharur शहराचे रत्न, महाराष्ट्रासह अनेक राज्यात नावलौकीक मिळालेला प.पु. आशिष महाराज यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये भव्य गुरुपोर्णीमा उत्सव व समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
( Guru Poornima festival and award distribution ceremony on Monday in Dharur; P.P. Presence of Ashish Maharaj. )
दि.3 जुलै सोमवार रोजी धारुर Dharur शहरातील उदयनगर भागातील गरड मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी असून प्रमूख पाहूणे अंबासाखर चेअरमन रमेशराव आडसकर, छत्रपती साखरचे व्हा.चेअरमन मोहनदादा जगताप,माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, प्रसिद्ध उद्योजक उदयसिंह काका दिख्खत, सभापती मंगेश महादेव तोंडे, उपसभापती सुनिल शिनगारे, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, सरपंच अमोल जगताप, गिरीराज पतसंस्थेचे चेअरमन अनिल चिद्रवार, प्रकाश महाराज साठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष राम शेळके, व्हाईस मेडीयाचे अध्यक्ष सचिन थोरात यांचेसह अनेक मान्यवराच्या उपस्थित मध्ये सोहळा संपन्न होत आहे. तरी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वगताध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.