जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे निधन

ठाणे : मराठी रंगभूमी, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन (83) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. रवी पटवर्धन (Ravi Patwardhan) यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह अनेक मालिकांमध्येही काम केले होते.

भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. रवी पटवर्धनांनी (Ravi Patwardhan)  दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्चमध्येही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंड असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!