अनाथांच्या माई सिंधूताई सपकाळ यांच निधन; महाराष्ट्र हळहळला.

पुणे दि.4 जानेवारी – अनाथांच्या माई म्हणून संपूर्ण देशभरात परिचीत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच आज पुण्यात निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या.
(Orphan Mai Sindhutai Sapkal dies; Maharashtra was shaken.)
महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. आज रात्री सव्वा आठ वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. बुधवारी सकाळी बारा वाजता पुण्यात त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
सिंधूताई पुण्यातील (Pune) गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये (Galaxy Hospital) दाखल होत्या. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या (heart attack) झटक्याने त्यांचं निधन झाले.