पंकजा मुंडे आज धारुरात… रंगपंचमीला कोणता रंग उधळणार…?

किल्ले धारूर दि.22 मार्च – आज मंगळवारी (दि.22) माजी मंत्री पंकजा मुंडे धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) चांगलीच चर्चेत आलेली असून आज रंगपंचमी दिवशी पंकजा मुंडे (Pankaja Munde) कोणता रंग उधळणार याकडे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Market Yard) माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे (Pritam Munde) यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व या यार्डातील विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजार समितीच्या प्रांगणात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होत आहे.

गेल्या काही दिवसांत नोकर भरती, निकृष्ट कामे व संचालकातील अंतर्गत वादामुळे बाजार समिती चांगलीच चर्चेत आलेली. ऐवढेच नाही तर बाजार समिती भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या भाजपाचे नेते (BJP Leader) राजाभाऊ मुंडे यांनी बाजार समितीत केलेला राडा चांगलाच चर्चेत आला होता. या प्रकारानंतर प्रथमच पंकजा मुंडे दौऱ्यावर येत आहेत.

धारुरच्या (Dharur) अनोख्या रंगोत्सवाची आज रंगपंचमी दिनी सांगता होणार आहे. याच रंगपंचमीला माजी मंत्री पंकजा मुंडे या बहुचर्चित बाजार समितीचा दौरा करत आहेत. दोन दिवसांपुर्वीच आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी धारुरला येवून नगर परिषदेची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत रखडलेला पाणी प्रश्न तीन महिन्यात मार्गी लावण्याची सुचना त्यांनी प्रशासक, मुख्याधिकारी व कंत्राटदाराला केली.

येथील नगर परिषद व कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाच्या ताब्यात होत्या. कार्यकाल संपल्यामुळे सध्या नगर परिषदेवर प्रशासक असून बाजार समितीवर काही दिवसांत प्रशासक येणार आहे. यामुळे आजचा मुंडे भगिनींचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. बाजार समितीत दुभंगलेल्या मनाचे नेते व संचालक यांना नव्या उमेदीने काम करण्यासाठी मुंडे भगिनी आज कोणता रंग उधळणार याकडे लक्ष लागले आहे.
( Pankaja Munde in Dharur today … What color will be splashed on Rangpanchami …? )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!