अन पंकजा मुंडे म्हणल्या ‘कार्यकर्त्यांना तरी येतो ना चुना लावायला..?’

बीड दि.29 नोव्हेंबर – बीडमध्ये एका सामान्य पान टपरी चालकाच्या टपरीवर जावून पंकजा मुंडे यांनी पानाचा आस्वाद घेत स्वतःच्या हाताने सहकाऱ्यांनाही पान बनवून दिल्याच्या प्रकारामुळे पंकजा यांचे कौतूक होत असून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी ताज्या होत आहेत.

(Pankaja Munde said, “Do activists come to apply lime?”)

औरंगाबादहून परळीकडे जात असताना बीडमध्ये (Beed) आल्यानंतर पंकजा मुंडे बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला, पंकजा मुंडेंनी देखील होकार दित तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्याही..! पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले.

यावेळी कार्यकर्त्यांनी विनोदी भाषेत म्हटलं आहे की, पंकजा ताईला एकच गोष्ट करता येत नाही ती म्हणजेच चुना लावायला येत नाही, यावर पंकजा मुंडे म्हणल्या की, कार्यकर्त्यांना तरी येतो ना चुना लावायला. या व्हिडीओ ने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी याप्रसंगावरुन दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पंकजा मुंडे औरंगाबादहून (Aurangabad) परळीकडे जात होत्या, बीडमध्ये ज्येष्ठ संपादक गंमत भंडारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गेल्या होत्या, पंकजा मुंडे (Pankaja Munde) बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांना त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला, पंकजा मुंडेनी त्यांना लगेच होकार दिला आणि तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्याही.

पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर (Ramesh Asaskar), अक्षय मुंदडा, सर्जेराव तांदळे आदी यावेळी सोबत होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!