कोरोंना विशेष

पालकांनो काळजी घ्या … राज्यात लहान बालकं कोरोनाच्या विळख्यात.

मुंबई दि.1 एप्रिल – महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या लहान बालकांमध्ये कोरोना बाधित (Corona Positive) होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) व पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. एकट्या मार्च महिन्यात 15 हजार मुलांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. चिंताजनक म्हणजे या सर्व मुलांचं वय हे 10 वर्षांखालील आहे.

(Parents, take care … The little ones in the state are in Corona’s lap.)

दर 10 मुलांमागे 2 मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) येत आहेत. त्यामुळे पालकांसाठी हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासूनच ज्येष्ठांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात येत आहे. मात्र आता लहान मुलांभोवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. अनेक निर्बंध शिथिल झाल्याने लहान मुलांनाही घराबाहेर नेण्यात येत आहे, त्यामुळे आता त्यांनाही कोरोना होऊ लागला असल्याचे दिसुन येत आहे.

मार्चमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढलेला आहे. दररोज 30-40 हजाराच्या घरात नवे कोरोनाग्रस्त सापडत आहेत. त्यात मार्चमध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 15 हजार मुलांना तर 10 ते 20 वर्षाच्या मुलांची संख्याही 40 हजाराच्या घरात आहे. मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातील आकडेवारीनुसार जानेवारीत 10 वर्षांखालील 2 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. फेब्रुवारीत 2 हजार 700 कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र एकट्या मार्च महिन्यात हा आकडा वाढून 15 हजार 500 वर पोहोचला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) व डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनी घाबरण्याची गरज नसुन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

अशी घ्या काळजी ….
*लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका.
*त्यांना मास्क, सॅनिटायझर तसच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं महत्व समजावून सांगा.
*बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यास सांगा.
*मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देणं टाळा.
*सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!