परळी सुन्न आहे…. करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडे यांचे ट्वीट.

मुंबई दि.7 सप्टेंबर – परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आले व ॲट्रासिटीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. गेली दोन दिवस व्हिडीओ व अॉडीओ वॉर सुरु असताना पंकजा मुंडेचं मौन होतं. आता मात्र दोन दिवसानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मौन सोडत ट्वीट केलं आहे.

(Parli is numb …. Pankaja Munde’s tweet on Karuna Sharma case.)

वैद्यनाथ मंदिर परिसरात आलेल्या करूणा शर्मा यांचा महिलांशी वाद झाला. एका महिलेच्या तक्रारीनंतर करूणा शर्मा यांच्यावर परळी पोलिसांनी त्यांच्यावर ॲट्रासिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल केला होता. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी (Police custody) सुनावली आहे. या प्रकरणावरुन आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सुचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या संदर्भातील पंकजा मुंडे यांचे ट्वीट. ”अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!” अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

दरम्यान, परळी शहरात रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल (video viral) करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानूसार करूणा शर्मा या रविवारी दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शन घेऊन जात असतांनाच त्यांची मंदिर परिसरात काही महिलाशी बाचाबाची झाली. यावेळी करूणा शर्मा यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी (Police) करुणा यांच्याविरोधात अॅट्राॅसिटी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान करुणा शर्मा यांनीही पोलिसांत तक्रार दिली असल्याची माहिती येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!