शुक्रवारी राज्यात दहा हजार पार… बीड जिल्ह्यात शंभरी

मुंबई : दि.6 मार्च – महाराष्ट्र पुन्हा देशात कोरोना आकडेवारीत टॉपवर येत आहे. दिवसेंदिवस आकडेवारी फुगत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात (Maharashtra) 10,216 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 53 करोना बाधित रुग्णांचा मृत्यूं झाला. 6,467 रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.52% एवढे आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.38% एवढा आहे.
(Ten thousand crosses in the state on Friday … one hundred in Beed district)
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,66,86,880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 21,98,399 (13.17 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. सध्या राज्यात 4,10,411 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,203 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 88,838 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patients) आहेत. वाढती कोरोनाबाधितांची संख्येमुळे बंद कोविड केअर सेंटर सुरु करावी लागत आहेत. काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर येथे मोठी संख्या आल्याने तसा निर्णय घेण्यात आला.
बीड जिल्ह्यातही एका आठवड्यात कोरोनाबाधितांची (Corona Positive) संख्या तीनशेच्या वर गेली आहे. काल 95 रुग्ण कोरोनाबाधित आढळली. तर केंद्रीय जवाहर विद्यालयात 20 कोरोना बाधित आढळल्याची घटना घडली. यामुळे जिल्हा प्रशासनाने नवीन आदेश काढत निर्बंध वाढवले असून 31 मार्चपर्यंत आठवडे बाजार बंदीचा निर्णय घेतला आहे.