ऑनलाइन फसवणूकीचा तपास लावण्यात पोलिसांना यश; सायबर विभागाचे कौतूक.

उस्मानाबाद दि.21 जुलै – सध्या अॉनलाईन आर्थिक फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढली असून परराज्यात अशा टोळ्या सक्रीय आहेत. अनेकवेळा अशा गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांकडे तक्रारी कमी येतात.परंतू पोलिसांकडून आता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष पथक निर्माण करुन दोषींना जेरबंद केले जात आहे. अशाच एका प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांना मोठे यश आले आहे.
रिलायन्स फायनान्स कंपनीचा (Reliance Finance Company) व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी करुन एका व्यक्तीची ऑनलाइन आर्थिक फसवणूक (Online fraud) केल्याचा प्रकार उस्मानाबाद येथे डिसेंबर 2020 मध्ये घडला होता. या प्रकरणात उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन उस्मानाबाद सायबर पोलिसांनी (Osmanabad Cyber Police) आरोपीच्या बिहार राज्यातून मुसक्या आवळल्या आहेत.
(Police succeed in investigating online fraud; Appreciation of the cyber department.)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद शिरसाठ यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मी रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असून तुम्हाला एक लाख रुपयांचे कर्ज मंजुर झाले असल्याचे सांगितले. तसेच सिरसाठ यांच्याकडून कर्ज प्रक्रियेसाठी 30,229 रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. सिरसाठ यांनी त्या व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्या पैसे जमा केले. परंतु कर्जाची रक्कम मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सिरसाठ यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे (Cyber police station) अधिकारी आणि कर्मचारी करत होते. सायबर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाच्या तसेच बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण (Technical analysis) केले. त्यावेळी हा गुन्हा राहुल लहेरी याने केल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन आरोपीचा सात दिवस शोध घेऊन त्याला अटक केली.
आरोपी मंगळवारी उस्मानाबादेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) राज रोशन तिलक यांच्या मार्गदशनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (Police Inspector) अर्चना पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी, पोलीस नाईक संजय हालसे, राहुल नाईकवाडी, गणेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आकाश तिळगुळे, मकसुद काझी, अनिल भोसले, सुनिल मोरे, गणेश हजारे, विमल पौळ, नलावडे, अपेक्षा खांडेकर यांनी आरोपीच्या मोबाईल आणि बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण केले. तर पोलीस उपनिरीक्षक अनिल टोंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश खैरे, बळीराम घुगे यांच्या पथकाने बिहारमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (Police Inspector) अर्चना पाटील या करत आहेत.
हा प्रकार डिसेंबर 2020 मध्ये घडला होता. उस्मानाबाद सायबर पोलिसांनी (Osmanabad Cyber Police) आरोपीचा बिहारमध्ये 7 दिवस राहून शोध घेतला. राहुल कुमार लखन प्रसाद लहेरी (वय- 21 रा. भागलपुर, राज्य बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शरद नामदेव सिरसाठ (रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद) यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात (Osmanabad Rural Police Station) फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपी विरोधात 420 सह माहिती तंत्रज्ञान कलम 66(सी) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांनी करुन आरोपीला अटक केली. यामुळे उस्मानाबाद सायबर विभागाचे कौतूक होत आहे.