कोरोना रुग्णाची गळफास घेवून आत्महत्या; बीडमध्ये खळबळ.

बीड दि.21 मे – बीड (Beed) शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवार दि.21 रोजी पहाटेच्या सुमारास खळबळजनक घटना उघडकीस आली. गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या (Suicide) केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी (Police) धाव घेतली.
(Corona patient commits suicide by strangulation; Sensation in the Beed.)
रामलिंग महादेव सानप (वय 35 रा. तांदळ्याचीवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णाचे नाव आहे. घटनास्थळी बीड शहर पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी धाव घेत घटनेची दखल घेतली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान तणावातून या रुग्णाने आत्महत्या (Suicide) केली असावी असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. येथील जिल्हा रुग्णालयातही एका कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांने काही दिवसांपूर्वी इमारती वरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. या पाठोपाठ घडलेल्या या घटनेमुळे बीड (Beed) शहरात खळबळ उडाली आहे.