कोरोंना विशेष

चिंताजनक … चीनमध्ये आढळला कोरोनाचा नवा विषाणू

बीजिंग (वृत्तसंस्था) दि.13 जून – वटवाघळांमध्ये नवीन कोरोना विषाणू सापडला असल्याचा दावा चिनी संशोधकांनी (Chinese researchers) केला आहे. जगभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना नवीन कोरोना विषाणू सापडल्याच्या या दाव्यामुळे संशोधकांची चिंता आणखीनच वाढली आहे.

(Worrying … New corona virus found in China)

या वटवाघुळांमध्ये नव्याने सापडलेल्या विषाणूंमध्ये कोविड -19 विषाणूच्या अनुवांशिकदृष्ट्‌या सर्वात जवळचा दुसऱ्या क्रमांकाचा विषाणू देखील असू शकतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे. नैऋत्येकडील वटवाघुळांमध्ये किती विषाणू आहेत आणि त्यापैकी कितीचा माणसांमध्ये प्रदुर्भाव होऊ शकतो यासंदर्भात हे संशोधन झाले होते.

वटवाघुळांमधील प्रजातींमधील सार्स कोव-2 (SARS Cove-2) सारख्या कोरोना विषाणूच्या (Corona virus) एकूण 24 विषाणूंचे जीनोम एकत्र केले गेले.

मे 2019 आणि नोव्हेंबर 2020 दरम्यान लहान वटवाघुळांच्या तोंडामधून हे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये सापडलेल्या विषाणूंमध्ये कोरोनाची साथ पसरवणाऱ्या विषाणूशी साधर्म्य असलेल्या विषाणूचाही समावेश आहे, असे सेल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात शेडोंग विद्यापीठाच्या चिनी संशोधकांनी (Chinese researchers) सांगितले.

कोरोना विषाणूच्या (Corona virus) उत्पत्तीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) केले जात असलेले संशोधन प्रगतीपथावर आहे. याच दरम्यान नवीन विषाणू सापडला आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!