तब्बल ६८ दिवसानंतर आली पॉझिटीव्ह बातमी… पहा काय आहे कोरोनाची आजची स्थिती

किल्लेधारूर दि.८(वार्ताहर) दोन महिन्यात आज पहिल्यांदा धारुर तालुक्यासाठी पॉझिटीव्ह (positive) रुग्ण केवळ एकच आढळल्याची बातमी आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या २१ संशयितांच्या ॲन्टीजन (antigen) तपासणीत केवळ एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला. तब्बल ६८ दिवसानंतर केवळ एकच पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळण्याची घटना घडली आहे.
३१ जुलै २०२० पासून शहरात दररोज कोरोना (Corona) बाधितांची संख्या आढळून येत आहे. सदरील संख्येत दररोज वाढता आलेख आढळून येत होता. तब्बल ६८ दिवसानंतर पहिल्यांदाच केवळ एक पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळून येण्याची घटना घडली. यामुळे आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे २१ ॲन्टीजन तर २८ स्वॅब (Swab) नमुन्यात एक अनिर्णित तर एक पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे व कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन तपासणीत आढळून आलेला कोरोना (Corona) पॉझिटीव्ह (positive) रुग्ण हा ५० वर्षीय पुरुष तालुक्यातील आसोला या गावातील आहे.