मंगळवारी संख्येत वाढ… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.29 जून – बीड (Beed) जिल्ह्यात आज 3561 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 170 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3391 जण निगेटिव्ह आली आहेत. आजच्या पॉझिटीव्ह अहवालाची संख्या वाढली असून आष्टी व वडवणीचा यात समावेश आहे.
(Positivity rate dropped … Today’s corona update in Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-19, अंबाजोगाई-8, आष्टी-64, धारुर-3, गेवराई-18, केज-11, माजलगाव-7, परळी-2, पाटोदा-14, शिरुर-12, वडवणी-12 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात तब्बल 12 हजार 503 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून यात 416 कोरोना बाधित आढळून आली आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट मोठ्या प्रमाणात उतरत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात 10 हजार 812 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 58 लाख 925 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.99 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात राज्यात 6 हजार 627 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
दिवसभरात 101 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.1 टक्के इतका झाला. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 12 लाख 8 हजार 361 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 43 हजार 548 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 839 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.