माझं गाव

प्रकाशदादा फॉर्मात…. आ. प्रकाश सोंळके यांची आज नगर परिषद आढावा बैठक.

किल्ले धारूर दि.20 मार्च – धारूर नगर परिषदेच्या (Dharur Municipal Council) विकास कामाचा आढावा घेण्यासाठी माजलगाव मतदारसंघाचे आ. प्रकाशदादा सोंळके यांनी आज रविवारी (दि.20) रोजी विकास आढावा बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे.

आमदार प्रकाशदादा सोळंके सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळात आक्रमक पावित्र्यात दिसून येत आहेत. 2016 मध्ये नगर परिषद धारुर सार्वत्रिक निवडणूकीत पराभव झाल्यानंतर ते प्रथमच नगर परिषदेत येत आहेत. यामुळे येथील विकास कामाबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

धारूर नगर परिषदेची आढावा बैठक आ. प्रकाशदादा सोंळके (MLA Prakash Solanke) यांच्या उपस्थितीत आज रविवार दि.20 मार्च रोजी नगर परिषदेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजीत करण्यात आली आहे. प्रशासक, मुख्याधिकारी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत आ. प्रकाशदादा सोंळके आढावा घेणार आहेत.

प्रलंबित विकास कामाना गती देण्याचे दृष्टीने आ. सोळंके मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकी नंतर तालूक्यातील पत्रकारांशी (Press) ते संवाद साधणार आहेत. गेल्या पाच वर्षातील नगर परिषदेचा कारभार, नागरीकांच्या तक्रारी व विकास कामे पाहता पत्रकार परिषदेत आ.सोळंके काय बोलणार याकडे आता लक्ष लागले आहे.

प्रकाशदादा फॉर्मात….
सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.सोळंके चांगलेच आक्रमक पावित्र्यात दिसून आले. हगांमी सभापती भास्करराव जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सुद्धा सभागृहात इतर सदस्याला थांबवून प्रकाशदादा फॉर्मात असल्याचे सांगत त्यांना बोलण्याची संधी दिली. अधिवेशनात आ. सोळंके यांनी भल्या भल्यांना फैलावर घेत प्रसंगी सरकारचे कान ओडण्याचेही काम केले.

आ. सोळंके यांनी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीजेच्या प्रश्नासह, पाटोदा नगर पंचायत घोटाळा, धारुरहून जाणाऱ्या पाडळसिंगी धारुर (Dharur) लोखंडी सावरगाव रस्ता आदी प्रश्न आक्रमकपणे मांडले. तर सरकारच्या अर्थसंकल्पाचे कौतूकही केले. आ. सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (Nationalist Congress Party) निवडून आलेले सर्वात ज्येष्ठ व विधिमंडळात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत.
( Prakashdada in form ….  Municipal Council review meeting of Prakash Sonalke today. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!