बीड

Leopard धारुर वनक्षेत्रात पुन्हा बिबट्याची दहशत.

58 / 100

किल्लेधारुर दि.11 अॉगस्ट – leopard धारुर वनपरिक्षेत्रात forest काही दिवसांपुर्वीच मृत बिबट्या आढळून आला होता. यानंतर पुन्हा एकदा सोन्नाखोटा येथे गुरुवारी रात्री दोन बिबट leopard दिसून आल्याची चर्चा होत असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर Dharur वनपरिक्षेत्र परिमंडळात forest office धारुरसह केज, माजलगाव व वडवणी Wadvani तालुक्याचा मोठा भाग समाविष्ट आहे. या वनपरिक्षेत्रात अनेक वन्यजीव आढळून येतात. गेल्याच महिन्यात दि.22 जुलै रोजी धारुरपासून जवळच असलेल्या वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे ऊसाच्या शेतात मृत बिबट्या leopard आढळला होता. यानंतर याच परिसरातील सोन्नाखोटा ता. वडवणी Wadvani येथे गुरुवारी (दि.10) रात्री जगन्नाथ लोंढे यांच्या शेतात दोन बिबट दिसल्याची चर्चा आहे. तशा पोस्ट सोशल social media माध्यमातून व्यायरल होत असून यामुळे परिसरात दहशत माजली आहे. याबाबत धारुरचे वनाधिकारी दिनेश मोरे यांच्याशी संपर्क केला असता मोरे यांनी अनेकांनी याबाबत कल्पना दिल्याचे सांगितले. परिसरात जावून पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!