माझं गाव

आज धारुरात दिग्गज येणार एकाच मंचावर; आ.सोळंके, आडसकरसह पंजाबराव डखांची उपस्थिती.

किल्लेधारूर दि.6 जानेवारी – किल्लेधारूर तालूका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिना (Darpan Din) निमीत्त आज 6 जानेवारी रोजी हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjab Dakh) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आ.प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) भाजपा नेते रमेशराव आडसकर (Ramesh Adaskar) यांच्यासह शहर व तालुक्यातील दिग्गज एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.

(Punjabrao Dakh at Dharur on 6th January … Darpan Din celebration.)

किल्लेधारूर तालूका पत्रकार संघाच्या वतीने दि. 6 जानेवारी रोजी दर्पण दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगरेश्वर मंदीर धारूर येथे आज दुपारी 3 वाजता हा दर्पण दिन सोहळा संपन्न होणार आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या देशातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट पत्रकार व शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. सध्याचे तंतोतंत हवामानाचे अंदाज सांगणारे हवामान तज्ञ (Meteorologist) पंजाबराव डख यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. प्रकाशदादा सोंळके तर प्रमूख पाहूणे म्हणून माजलगाव मतदार संघाचे भाजपाचे नेते रमेशराव आडसकर हे उपस्थीत राहणार आहेत.

यावेळी मावळते नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जयसिंग भैय्या सोंळके (Jaising Solanke), माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक माधवराव निर्मळ (Madhav Nirmal), ज्येष्ठ संपादक अजित वरपे, उद्योजक नगरसेवक अर्जूनराव गायकवाड , बाजार समितीचे सभापती सुनिल शिनगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जेष्ठ नेते हनूमंतबप्पा नागरगोजे आदी उपस्थित राहणार आहेत.

यांचा होणार सन्मान
या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवा पत्रकार सचिन थोरात यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील उद्योन्मुख शिल्पकार सुधीर उमाप, कोविड योद्धा म्हणून ज्ञानेश्वर शिंदे, तर शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून जयदत्त शिनगारे, विश्वांभर गायकवाड, उषा बडे, अविनाश सोळंके यांचा सन्मान होणार आहे.

या कार्यक्रमास कोविड संसर्ग (Corona infection) पाहता सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास येणाऱ्या शेतकऱ्यांना सोशल डिस्टंटींग (Social distance), मास्कचा (Mask) वापर अनिवार्य असणार आहे. कोविड नियमांचे (Covid guidelines) पालन करुन उपस्थित राहावे असे आवाहन किल्लेधारूर (Dharur) तालूका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!