कोरोंना विशेष

धारुरात खबरदारी; आज प्रतिक्षा १८ स्वॅब ची

किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर) शहरातील अशोक नगर भागात बाधित बालकाच्या कुटूंबातील ७० वर्षीय वृध्द महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात असून आरोग्य विभागाकडून तालुक्यातील १८ जनांचे स्वॅब नमुने काल पाठवली असून आज सांयकाळी त्या स्वॅबचा अहवाल येणार आहे.

आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. आशोक नगर भागात लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना खबरदारी म्हणून समोर येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बाधित कुटूंबातील व्यक्तींचे स्वॅब नमुने पुन्हा घेण्यात येणार असल्याचे डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले. आज तालुक्यातील १८ स्वॅब नमुन्यात धारुर शहरातील ६, चोरोंबा येथील सर्वाधिक ९ तर आवरगाव, चिंचपुर व मोरफळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. शहरात काल सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णामुळे आजवर एकुण ३ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एक रुग्ण पुर्ण बरा होवून परतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!