बीड जिल्ह्यात दिलासा … आज 947 जणांची कोरोनावर मात; 48 तासात परळीत उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर.

परळी दि. 22 एप्रिल – बीड जिल्ह्यात आज कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 947 असून अवघ्या 48 तासात परळी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचे (Oxygen bed) कोविड केअर सेंटर (Covid care center) उभे करण्यात आल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळाले. परळी तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आरोग्य यंत्रणेसह अन्य यंत्रणा कामाला लावून हे कोविड केअर सेंटर उद्या शुक्रवार दि. 23 पासून कार्यान्वित करण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे.

(Relief in Beed district … Today 947 people defeated Korona; Covid Care Center of 50 Oxygen Beds erected in Parli in 48 hours.)

परळी ग्रामीण रुग्णालयात सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक सामग्री दोन दिवसात उभारण्यात आली असून, यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते व इतरांनी आवश्यक ती कार्यवाही पार पाडली.

दरम्यान या 50 अॉक्सिजन बेडच्या (Oxygen bed) व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, यांपैकी 20 बेड उद्या (दि. 23) रोजी तर उर्वरित 30 बेड येत्या दोन दिवसात रुग्णांसाठी उपलब्ध होतील. शिवाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या नियमित रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्षद शेख यांनी दिली आहे.

परळीत सध्या समाज कल्याण विभागाच्या दोन वस्तीगृहामध्ये मिळून सौम्य व लक्षणे नसलेल्या 200 कोरोना बाधितांची (Corona Positive) सोय करण्यात आली आहे. या शिवाय शहरातील सात डॉक्टरांनी आपल्या खाजगी रुग्णालयात कोरोना बाधितावर (Corona Positive) उपचार सुरू केले आहेत. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शहरातील डॉक्टरांशी नियमित संवाद ठेवून या संकटात जास्तीत जास्त सेवा द्यावी असे आवाहन डॉक्टरांना केले आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एक हजार ते बाराशे नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. परिस्थिती चिघळत असताना कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही समाधानकारक दिसत आहे. आज जिल्हाभरातील विविध ठिकाणच्या कोविड केअर सेंटरवर (Covid care center) उपचार घेत असलेल्या 947 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. या बाधितांना घरी सुट्टी देण्यात आली असुन प्रशासनाकडून कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी घरीच राहुन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!