कळमनुरीत होणार राजीव सातव यांचे अंत्यसंस्कार; पहा सातव यांचा राजकीय प्रवास.

कळमनुरी दि.17 मे – राजीव सातव (Rajiv Satav) यांचे पार्थिव रात्री 9 वाजेच्या दरम्यान कळमनुरी येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या चाहते व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. राजीव सातव यांच्या निवासस्थानी त्यांचे शव पाहताच अनेक कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राजीव सातव अमर रहे, राजीव सातव जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आज सकाळी 10.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

(Rajiv Satav’s funeral to be held at Kalamanuri; See Satav’s political journey.)

याठिकाणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार मयूर खेंगले आदींची उपस्थिती होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सातव यांचे घर ते मुख्य रस्त्यापर्यंत त्यांच्या चाहत्यांना-येण्यासाठी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार जीशान सिद्दिकी आदींची उपस्थिती होती. गर्दी होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, सपोनि श्रीनिवास रोयलावार, फौजदार ज्ञानोबा मुलगीर, सिद्दिकी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनाने सर्वच स्तरातून दु:खं व्यक्त होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून (Rahul Gandhi) अनेक काँग्रेस नेते आणि राज्यातील नेत्यांनी राजीव सातव यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. पुण्याच्या जहाँगीर हॉस्पिटलमध्ये (Jahangir Hospital) राजीव सावत यांचे रविवारी पहाटे निधन झाले.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात (Jahangir Hospital) उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा राजीव सातव यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता आणि शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला होता. अखेर रविवारी सकाळी त्यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन झालं.

पंचायत समिती सदस्य, आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. काँग्रेसचे (Congress Party) भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. राजीव सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे.

राजीव सातव यांचा जन्म 21 सप्टेंबर 1974 साली हिंगोली जिल्ह्यातील मसोड, तालुका कळमनुरी येथे झाला. त्यांच्या आई, रजनी सातव या शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होत्या. राजीव सातव यांनी आपलं शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून पूर्ण केलं. 2002 साली त्यांचा विवाह झाला आणि सध्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोली सारख्या एका छोट्याश्या जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार अशी अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी मजल मारली. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेले राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिलं. उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान या धोरणाने काँग्रेस पक्षात (Congress Party) त्यांनी आपलं मोठं वजन निर्माण केले होतं. पक्षातही युवक काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष ते युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अशी पद त्यांनी भूषवली. शिवाय सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रित सदस्यही होते.

राजीव सातव यांची राजकीय कारकिर्द
2002 साली ते हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समिती सदस्यपदी निवडून गेले.
2007 साली ते हिंगोली जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांची कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी नियुक्ती झाली.
2008 साली ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
2009 साली ते कळमनुरी विधानसभेतुन पहिल्यांदा आमदार झाले.
2010 साली त्यांची अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

2014 साली ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि 16 व्या लोकसभेचे सदस्य झाले.
मार्च 2018 साली राजीव सातव अखिल भारतीय काँग्रेसचे ते गुजरात प्रभारी झाले.
मार्च 2020 साली त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!