अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; केज तालुक्यातील घटना.

केज दि.4 अॉक्टोंबर – केज (Kaij) तालुक्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या भावकितील नराधमाने शेतात नेऊन बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. सदरील अतिप्रसंगानंतर अल्पवयीन पीडित मुलगी ही पाच महिन्याची गरोदर असल्याचे उघडकीस आले. केज पोलिसांत (Police) याघटनेचा गुन्हा नोंद झाला आहे.
(Rape of a minor girl; Incidents in Kaij taluka.)
केज तालुक्यातील एका गावात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (minor girl) तिच्याच भावकितील नराधमाने, तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणुन त्याच्या शेतामध्ये नेऊन तिच्या सोबत वारंवार बलात्कार केला. त्यातून ती अल्पवयीन पीडित मुलगी पाच महिण्याची गोरदर राहिली आहे.
आज दि.4 ऑक्टोबर रोजी पीडित मुलीने केज पोलीस ठाण्यात (Police station) दिलेल्या जबाबा वरून तिच्या भावकितील नराधमाच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात भा द वी 376 (2) ( 376 (एन) 376 (एफ) यासह अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा पोक्सो (Pocso) कलम 4 व 6 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अलिकडे केज तालुक्यात अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Polic Inspector) शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) सिमाली कोळी आणि रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.